शेतकर्‍यांची गैरसोय होऊ देऊ नका : आ. बडोले

    दिनांक :21-May-2026
Total Views |
- मका व धान खरेदीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

अर्जुनी मोरगाव, 
रब्बी हंगामातील मका व धान खरेदी प्रक्रियेत शेतकर्‍यांना येणार्‍या विविध अडचणींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात MLA Rajkumar Badole आमदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत खरेदी केंद्रांवरील समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
 
 
arjuni
 
MLA Rajkumar Badoleबैठकीदरम्यान शेतकर्‍यांना मका व धान खरेदी केंद्रांवर भेडसावणार्‍या अनेक अडचणींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विशेषतः खरेदी प्रक्रियेत होणारा विलंब, वजनकाट्यांची अपुरी उपलब्धता, शेतकर्‍यांच्या मालाच्या भरणा प्रक्रियेत होणारा उशीर, गोदाम क्षमतेची कमतरता तसेच वाहतूक व्यवस्थेतील अडथळे यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी आ. राजकुमार बडोले यांनी संबंधित अधिकार्‍यांना स्पष्ट निर्देश देताना शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रत्येक खरेदी केंद्रावर पुरेशा कर्मचार्‍यांची नेमणूक करा आणि शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचे पेमेंट वेळेत मिळेल याची खात्री करा. तसेच खरेदी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत राबविण्याचे निर्देश दिले. बैठकीत जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांनीही विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जि.प. सभापती लक्ष्मण भगत, माजी जि. प. सदस्य किशोर तरोणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रेम रहांगडाले, बाजार समिती संचालक सभापती अविनाश काशिवार, भाजपा महामंत्री प्रशांत शहारे, विजय कापगते, माजी जि.प. सदस्य रतीराम राणे, जिल्हा पुरवठा अधिकारी पाटील, जिल्हा मार्केटिंग अधिकारी इंगळे, टीडीसीचे विभागीय व्यवस्थापक धीरज चौधरी, चेतन नाकाडे, ललित डोंगरवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.