हफ्ते चुकवले तर मोबाईल लॉक!

आरबीआयचा नवा नियम

    दिनांक :21-May-2026
Total Views |
मुंबई
RBI आजच्या काळात महागडे स्मार्टफोन ईएमआयवर घेणे सामान्य झाले आहे. अनेक कंपन्या आणि बँका ग्राहकांना हफ्त्यांवर मोबाईल खरेदीची सुविधा देत आहेत. मात्र, हफ्ते वेळेवर न भरल्यास आता मोबाईल अंशतः लॉक होऊ शकतो. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) डिजिटल कर्ज देणाèया बँका आणि फिनटेक कंपन्यांसाठी नवीन मसुदा नियमावली तयार केली आहे. हा नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे.
  

mobile emi
 
RBI आरबीआयच्या नव्या मसुद्यानुसार, ज्या मोबाईलसाठी कर्ज घेतले आहे, त्या फोनवरच ही कारवाई लागू होईल. ग्राहकाने सलग 90 दिवस हप्ता न भरल्यास बँक किंवा फायनान्स कंपनीला फोनचे काही फीचर्स बंद करण्याचा अधिकार असेल. मात्र, फोन पूर्णपणे बंद करता येणार नाही.
RBI फोन लॉक करण्यापूर्वी बँकांना ग्राहकाला दोन वेळा नोटीस देणे बंधनकारक असेल.