जगभरात मोदी-मेलोनी 'केमिस्ट्रीची' धुमाकूळ!

कोट्यवधी व्ह्यूजचा नवा विक्रम

    दिनांक :21-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Modi-Meloni Chemistry Global भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या राष्ट्रध्यक्ष जॉर्जिया मेलोनीयांची भेट पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. दोन्ही नेते जेव्हा एकत्र दिसतात, तेव्हा इंटरनेटवर ‘मेलेडी’ ट्रेंडची जोरदार चर्चा सुरू होते. यावेळीही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला असून, मोदी आणि मेलोनी यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे. अलीकडील भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी मेलोनी यांना ‘मेलोडी’ टॉफीचे पाकीट भेट दिले. हा हलकाफुलका आणि मैत्रीपूर्ण क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. व्हिडिओमध्ये मेलोनी यांनी हसत मोदींचे आभार मानल्याचे दिसून येते. या छोट्याशा प्रसंगाने इंटरनेटवर पुन्हा एकदा ‘मेलोडी’ ट्रेंडला उधाण आले आहे. ‘मेलोडी’ हा शब्द मोदी आणि मेलोनी यांच्या नावांवरून तयार झालेला सोशल मीडिया ट्रेंड मानला जातो.
 
 

Modi-Meloni  
जॉर्जिया मेलोनी यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील मोदींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सर्वाधिक लोकप्रिय ठरत असल्याचेही दिसून आले आहे. जगातील अनेक मोठ्या नेत्यांसोबतचे फोटो त्यांनी शेअर केले असले, तरी मोदींसोबतच्या पोस्टना सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओने कोट्यवधी व्ह्यूजचा टप्पा पार केल्याचे सांगितले जात आहे. याआधी इटलीमध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषद २०२४दरम्यान दोन्ही नेत्यांचा एक सेल्फी व्हिडिओही प्रचंड व्हायरल झाला होता. मेलोनी यांनी “मेलोनी टीमकडून नमस्कार” असे कॅप्शन देत तो व्हिडिओ शेअर केला होता. त्या पोस्टनंतर सोशल मीडियावर मीम्स आणि मजेशीर पोस्ट्सचा अक्षरशः पूर आला होता.
 
 
दरम्यान, मेलोनीने डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग आणि इलॉन मस्कयांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, मोदींसोबतच्या पोस्टना मिळणारा प्रतिसाद इतर सर्व पोस्टपेक्षा अधिक असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यापूर्वीही जी-२० आणि इतर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मोदी आणि मेलोनी यांची मैत्रीपूर्ण भेट चर्चेचा विषय ठरली होती. दोन्ही नेत्यांमधील सहज संवाद आणि आपुलकीचे क्षण सोशल मीडिया वापरकर्त्यांना विशेष भावत असल्याचे पाहायला मिळत आहे.