मेलोडी कुणाची, गोडवा कुणाला....

मोदींच्या ‘मेलोडी डिप्लोमसी’चा फायदा चुकीच्या कंपनीला

    दिनांक :21-May-2026
Total Views |
मुंबई
Modi Melody पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना पारले कंपनीच्या मेलोडी टॉफीचे पाकीट भेट दिले. याचा व्हिडीओ स्वतः मेलोनी यांनी शेअर केला. व्हिडीओ व्हायरल होताच गुंतवणूकदारांनी नावाच्या गोंधळातून पारले इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी केले, त्यामुळे त्यात 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला.
 
modi melody 
Modi Melody विशेष म्हणजे मेलोडी टॉफी बनवणारी कंपनी पारले प्रॉडक्ट्स आहे, जी शेअर बाजारात सूचीबद्धच नाही. गुंतवणूकदारांनी चुकून रिअल इस्टेट कंपनी पारले इंडस्ट्रीजला मेलोडी बनवणारी कंपनी समजून त्यात गुंतवणूक केली.
गुंतवणूकदारांनी केली सट्टेबाजीची खरेदी
Modi Melody बीएसईवर पारले इंडस्ट्रीजचा शेअर 5 टक्क्यांनी वाढून 5.25 वर पोहोचला आणि वरच्या स्तरावर लॉक झाला. इंटरनेटवर पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांच्या ‘मेलोडी’ क्षणाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, गुंतवणूकदारांनी पूर्ण तपासणी न करता या पेनी स्टॉकमध्ये खरेदी सुरू केली. सोशल मीडियावर मेलोडी ब्रँडच्या मोठ्या चर्चेमुळे शेअर बाजारात हा गैरसमज झाला.
Modi Melody मेलोडी टॉफी पारले प्रॉडक्ट्स कंपनी बनवते, जी पारले-जी बिस्किट आणि इतर अनेक कन्फेक्शनरी वस्तूंसाठी ओळखली जाते. दुसरीकडे, ज्या पारले इंडस्ट्रीजचे शेअर्स वाढले, ती इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आणि पेपर वेस्ट रिसायकलिंगच्या व्यवसायात काम करते. शेअर बाजारात आलेल्या या वाढीवर पारले इंडस्ट्रीजकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.