परदेश दौऱ्यावरून परतताच मोदींची तातडीची बैठक!

    दिनांक :21-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Modi's Urgent Meeting मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठक होणार असून, या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पाच देशांच्या परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान मोदी तातडीने ही बैठक घेत असल्याने विविध महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा जागतिक बाजारपेठांवर परिणाम होत असून, त्याचा फटका भारतातील इंधन दर आणि पुरवठा व्यवस्थेलाही बसू शकतो. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या वाढत्या किमतींबाबत सरकार काही दिलासादायक निर्णय घेणार का, याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
 
Modi
 
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत देशातील महागाई, ऊर्जा सुरक्षेसंबंधी उपाययोजना आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर विशेष भर दिला जाऊ शकतो. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक, अन्नधान्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर होत असल्याने केंद्र सरकार विविध मंत्रालयांना आवश्यक सूचना देण्याची शक्यता आहे.बैठकीला सर्व केंद्रीय मंत्री, स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विविध मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा, सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांपर्यंत योजनांचा अधिक प्रभावी लाभ कसा पोहोचवता येईल, यावरही चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
 
याशिवाय, पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जा, खत, विमान वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि आयात-निर्यात क्षेत्रांवर होणाऱ्या परिणामांचाही आढावा घेतला जाऊ शकतो. भविष्यातील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारची तयारी आणि विविध विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावरही बैठकीत भर दिला जाऊ शकतो.दरम्यान, काही माध्यमांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ संदर्भातील मार्गदर्शक सूचना किंवा आपत्कालीन नियोजनावरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीतून कोणते निर्णय समोर येतात, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे.