मुंबई
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्यांचा हप्ता न मिळालेल्या लाखो महिलांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागासाठी तब्बल 730.51 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून, या निर्णयामुळे रखडलेले दोन्ही महिन्यांचे हप्ते पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर लाभार्थींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वित्त विभागाच्या मान्यतेनुसार मार्च 2026 महिन्यासाठी 365.2550 कोटी रुपये आणि एप्रिल 2026 साठी आणखी 365.2550 कोटी रुपये असा एकूण 730.5100 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे. हा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीमार्फत खर्च करण्यात येणार असून, निधी वापरताना काटकसरीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana अनेक महिलांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली होती. विशेषतः 14 मेपासून काही लाभार्थींना मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये मिळाल्याचे समोर आले. मात्र अनेक महिलांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा न झाल्याने त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण होते. काही महिलांनी आपले नाव योजनेतून वगळण्यात आले की काय, अशी भीतीही व्यक्त केली होती. आता नव्या शासन निर्णयानंतर उर्वरित पात्र महिलांनाही लवकरच थकीत हप्ता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने पात्रता पडताळणी आणि ई-केवायसी मोहिमेला गती दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लाभार्थी महिलांची नावे कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महिला व बाल विकास राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वेळा मुदतवाढ देऊनही मोठ्या संख्येने महिलांनी अनिवार्य ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. तसेच पात्रतेच्या निकषांची पडताळणी करताना अनेक प्रकरणांमध्ये विसंगती आढळून आली.
यामुळे जवळपास 70 लाख Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana महिलांना अपात्र घोषित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, पुढील हप्त्यांचा लाभ या महिलांना मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे दरमहा 1500 रुपयांची मदत मिळवणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तरीही ज्या महिलांनी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली असूनही मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात आता कोणत्याही क्षणी रक्कम जमा होऊ शकते, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो महिलांना दिलासा मिळाला असून, रखडलेले हप्ते लवकरच खात्यात जमा होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.