प्रेम विवाह केला म्हणून तब्बल आठ वेळा सक्तीने गर्भपात

    दिनांक :21-May-2026
Total Views |
नाशिक
Nashik caste harassment नाशिकमध्ये प्रेमविवाह करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेवर सासरच्या मंडळींकडून अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “तू आमच्या जातीची नाहीस,” असे म्हणत मानसिक व शारीरिक छळ केल्याबरोबरच तिच्यावर तब्बल आठ वेळा सक्तीने गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Nashik caste harassment case, 
पीडित महिलेचा प्रेमविवाह झाला असून सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असल्याचे दिसत होते. मात्र, लग्नानंतर सासूने सातत्याने “तू आमच्या जातीची नाहीस, तुझ्या मुलांना आम्ही स्वीकारणार नाही,” अशा प्रकारचे टोमणे मारत मानसिक छळ सुरू केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर सासरच्या मंडळींकडून दबाव टाकून गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले आणि या संपूर्ण काळात तिच्यावर सातत्याने मानसिक तसेच शारीरिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच, सासरच्यांनी पीडित महिलेला वारंवार शिवीगाळ करत “तुला वेडी ठरवून मानसिक रुग्णालयात दाखल करू,” अशी धमकी दिल्याचेही तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. नोकरीच्या निमित्ताने पतीसोबत पुण्यात वास्तव्यास असलेली ही महिला नंतर जुलै २०२५ मध्ये नाशिकला परतल्यानंतर तिच्या छळाचे प्रमाण अधिक वाढल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
या प्रकरणात आर्थिक Nashik caste harassment फसवणुकीचाही आरोप करण्यात आला आहे. घर खरेदीच्या नावाखाली पतीने तिचे सोन्या-चांदीचे दागिने मोडून त्यातून मिळालेले पैसे हडप केल्याचा आरोप असून, तसेच माहेरून अधिक पैसे आणि हुंडा आणण्यासाठी सतत दबाव टाकण्यात येत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.सततच्या छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पती विजय दशरथ महाजन, सासू निर्मला दशरथ महाजन आणि सासरे दशरथ तुकाराम महाजन यांच्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे नाशिक परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.