नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून प्रा. वसंत पुरके यांचा संताप
यवतमाळ,
NEET exam scam उच्च शिक्षणासाठी घेतल्या जाणात्यां प्रवेश परीक्षांमधील घोटाळ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेतील घोटाळा देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मोठमोठ्या ट्युशन क्लासेसचे संचालकही या प्रकरणात सहभागी असल्याचे समोर येत असल्याने हा प्रकार अत्यंत गंभीर बनला असून शैक्षणिक वृक्षाला लागलेली विषारी फळे विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत असल्याची भावना माजी शिक्षणमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. वसंत पुरके यांनी व्यक्त केली. यवतमाळ येथे पत्रपरिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, नीट परीक्षेत सुमारे 87 ते 88 पेपरफुटीच्या घटना समोर आल्या असून, देशभरातील जवळपास आठ ते नऊ कोटी विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असतानाही शिक्षणमंत्री गंभीर नसल्याची टीका त्यांनी केली.
NEET exam scam तंत्रज्ञान व वैद्यकीय शिक्षणासाठी शिकवणी घेणारे काही नामांकित शिक्षक आणि कोचिंग संस्थांचे संचालकही या घोटाळ्यात सहभागी असल्याचे समोर येत असल्याने विद्यार्थ्यांचा परीक्षांवरील विश्वास डळमळीत होत असल्याचे प्रा. पुरके म्हणाले. नीटसारख्या परीक्षांमधील घोटाळे पाहता यूपीएससीसारख्या वरिष्ठ स्तरावरील स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हताही धोक्यात आली आहे. एका बाजूला शासकीय शाळा बंद करून खाजगी शिक्षणसंस्थांना प्रोत्साहन द्यायचे आणि दुसèया बाजूला मोठमोठे घोटाळे करून गर्भश्रीमंतांच्या मुलांना पैशाच्या जोरावर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, हा प्रकार समाजासाठी अत्यंत घातक आहे, अशी टीकाही प्रा. वसंत पुरके यांनी केली.
राजकीय टीकेची पातळी घसरली
राजकीय क्षेत्रातील टीकेची घसरलेली पातळीही चिंताजनक असल्याचे सांगताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या ‘रिजेक्टेड माल’ या वक्तव्याचा निषेध केला. जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी आणि शरद पवार यांच्या काळात मतभेद असले तरी मनभेद नव्हते. सर्व नेते परस्परांशी आदराने संवाद साधत होते, असे सांगत त्यांनी राजकारणातील सभ्यता टिकविण्याची गरज व्यक्त केली.
शेतऱ्यां रील अन्याय थांबवा
नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत असताना संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याला पीकविमा मदतीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी देण्यास टाळाटाळ केली जात आहे, असेही प्रा. वसंत पुरके म्हणाले.