- मेट्रो सफारीचाही लुटला आनंद
गोंदिया,
Integrated Tribal Development Project एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी अंतर्गत येत असलेल्या शासकीय कन्या आश्रमशाळा बोरगाव/बाजार येथील उन्हाळी शिबिरातील विद्यार्थ्यांना सुप्त कला-गुणांना वाव देण्यासाठी १८ मे रोजी नागपूर येथे अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आश्रमशाळेतील २३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
ntegrated Tribal Development Project सदर अभ्यास दौर्यामध्ये झिरो माईल्स ते खापरी दरम्यान मेट्रोने विद्यार्थ्यांनी प्रवास केला. मेट्रोने प्रथमत:च प्रवास करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता. या आनंदामध्ये काही विद्यार्थ्यांनी गोंडी नृत्यावर डान्स करुन आनंद साजरा केला तर काही विद्यार्थ्यांनी ड्रामाच्या माध्यमातून राणी दुर्गावती यांचे सादरीकरण केले. काही विद्यार्थ्यांनी धावत्या मेट्रोमध्ये क्रांतीसुर्य वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे रांगोळीच्या स्वरुपात चित्र साकारले. तसेच काही विद्यार्थ्यांनी मेट्रोमध्ये मातीच्या कलाकृती, गोंडी चित्रे, बांबूपासून साहित्य तयार केले व उपस्थित अधिकारी यांचेसमोर सादरीकरण केले. आदिवासी विकास विभागाच्या वतीने उपायुक्त विकास राचेलवार, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नागपूर मयुरी शिंदे व प्रकल्प अधिकारी देवरी उमेश काशिद, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.सायली चिखलीकर, तसेच अधिकारी, मुख्याध्यापक, अधिक्षक व कर्मचारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भेटून संवाद साधला. यानंतर पोलिस आयुक्त कार्यालय, नागपूर येथे भेट देण्यात आली. या भेटीमध्ये पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांचेकडून विविध शस्त्रांबाबत माहिती देण्यात आली. तसेच कायदा व सुव्यवस्था संदर्भात विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करुन पोलिस विभागातील विविध पदाच्या नोकरी संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देवून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. तसेच आयपीएस अधिकारी होण्याचे अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रेरित असे मार्गदर्शन केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना शहरी भागातील आधुनिक सोयी-सुविधांची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उद्देशाने नागपूर येथील ’व्हीआर मॉल’ येथे एका विशेष भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी मॉलमध्ये मांडण्यात आलेल्या विविध वस्तूंची प्रदर्शने पाहिली, तसेच ’गेम टाईम झोन’मधील विविध खेळांचा आनंद घेतला.