विठ्ठल मंदिराने केला प्राथमिक आरोग्य केंद्राचा सन्मान

    दिनांक :21-May-2026
Total Views |
राष्ट्रीय गुणवत्ता मानांकनात जिल्ह्याचा मान उंचावला
 
पुलगाव, 
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थापन क्षेत्रात Primary Health Centre, Nachangaon प्राथमिक आरोग्य केंद्र नाचणगावने उल्लेेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन अंतर्गत मानाचा तुरा रोवला आहे. तब्बल आठ वर्षांनंतर जिल्ह्याला हे मानांकन प्राप्त करून देण्यात नाचणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यानिमित्ताने नाचणगाव येथील विठ्ठल मंदिराच्या विश्वस्तांनी आरोग्य अधिकार्‍यांचा सन्मान केला.
 
 
mandir
 
राष्ट्रीय पथकाद्वारे दिनांक २० व २१ एप्रिल दरम्यान करण्यात आलेल्या मूल्यांकनात प्राथमिक आरोग्य केंद्र नाचणगावने ८९.१९ टक्के गुण मिळवत उत्कृष्ट यश संपादन केले. या यशाबद्दल विठ्ठल रुमाई देवस्थान समिती, वारकरी मंडळी व ग्रामस्थांच्या वतीने केंद्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला.
 
 
Primary Health Centre, Nachangaon  या यशामागे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद झाडे आणि डॉ. आदिती लांबट यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण कर्मचार्‍यांचे वर्षभराचे अथक परिश्रम असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. सत्काराला उत्तर देताना डॉ. आदिती लांबट म्हणाल्या की हे यश एका-दोन दिवसांचे नसून वर्षभराच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित आहे. अनेक कर्मचार्‍यांनी स्वतःच्या सुट्ट्यांचा त्याग करून सुट्टीच्या दिवशीही आठ-आठ तास काम केले. श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानचे अध्यक्ष केशव दांडेकर व विश्वस्त मंडळाने नाचणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या यशाबद्दल आनंद व्यत करीत डॉ. आनंद झाडे, डॉ. आदिती लांबट आणि सर्व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले.