विनोद, रहस्य आणि गोंधळाची हटके मेजवानी

    दिनांक :21-May-2026
Total Views |
मुंबई
Pritam And Pedro teaser गोव्याच्या पार्श्वभूमीवर आधारित सायबर क्राईम, गैरसमज आणि अफलातून विनोद यांचा संगम असलेल्या ‘प्रीतम अँड पेड्रो’ या बहुचर्चित मालिकेचा टीझर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये या नव्या ओटीटी प्रोजेक्टबाबत उत्सुकता वाढली आहे. दोन पूर्णपणे भिन्न स्वभावांच्या व्यक्तींच्या आयुष्यात निर्माण होणारा गोंधळ आणि त्यातून उलगडणाऱ्या घटनांची झलक या टीझरमधून पाहायला मिळते.
 

Pritam And Pedro teaser, Arshad Warsi Pritam And Pedro, 
टीझरमध्ये अभिनेता वीर हिरानी ‘प्रीतम’च्या भूमिकेत दिसत असून, अरशद वारसी ‘पेड्रो’च्या भूमिकेत झळकत आहेत. दोघांमधील भन्नाट केमिस्ट्री, मजेशीर संवाद आणि एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या स्वभावामुळे निर्माण होणारे प्रसंग टीझरचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. “डेटा भिडतो दांड्याशी” आणि “गोंधळ भिडतो गैरसमजांशी” अशी अनोखी मांडणी या कथानकाला वेगळेपण देताना दिसते.
मालिकेत विक्रांत मेस्सी ‘मार्टिन’ ही गूढ Pritam And Pedro teaser  व्यक्तिरेखा साकारताना दिसणार असून, त्याच्या उपस्थितीमुळे कथानकात रहस्याची नवी किनार निर्माण होणार असल्याचे संकेत टीझरमधून मिळतात. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी आणि अभिनेत्री मोना सिंह यांच्या भूमिका देखील या मालिकेला अधिक रंगतदार बनवणार आहेत. विनोद, रहस्य, वेडेपणा आणि राजकुमार हिरानी यांच्या खास शैलीचा संगम या मालिकेत पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.या मालिकेचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी केले आहे. विशेष म्हणजे, ‘प्रीतम अँड पेड्रो’ ही निर्मिती राजकुमार हिरानी यांच्या बहुप्रतीक्षित ओटीटी पदार्पणामुळेही चर्चेत आली आहे. त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच या मालिकेतही मनोरंजनासोबत वेगळी कथा आणि हटके पात्रांचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
 
‘प्रीतम अँड पेड्रो’ ही मालिका ३ जुलैपासून ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर या मालिकेबाबत जोरदार चर्चा सुरू झाली असून, प्रेक्षक आता ट्रेलर आणि मालिकेच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.