मुंबई.
Profits in Mid-cap and Small-cap Stocks BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50मध्ये गुरुवारी दिवसभर चढ-उताराचे वातावरण पाहायला मिळाले. प्रमुख निर्देशांकांमध्ये फारशी हालचाल दिसली नसली तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनी बाजारात जोरदार कामगिरी करत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले.दिवसअखेर सेन्सेक्स १३५ अंकांनी घसरून ७५,१८३ वर बंद झाला, तर निफ्टी जवळपास स्थिर राहत २३,६५४ च्या पातळीवर बंद झाला. बाजारात दिवसभर अस्थिरता कायम होती, मात्र व्यापक बाजारात खरेदीचा उत्साह स्पष्टपणे दिसून आला.

सेक्टोरल पातळीवर रिअल्टी क्षेत्राने सर्वाधिक चमकदार कामगिरी केली. निफ्टी रिअल्टी निर्देशांकात एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली. याशिवाय कंझ्युमर ड्युरेबल्स आणि एनर्जी क्षेत्रातील शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळाली. दुसरीकडे आयटी आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्सवर दबाव कायम राहिला.ब्रॉडर मार्केटमध्ये स्मॉलकॅप शेअर्सनी विशेष चमक दाखवली. निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांकात चांगली वाढ नोंदवली गेली, तर मिडकॅप निर्देशांक जवळपास स्थिर राहिला. बाजारातील बहुतांश शेअर्समध्ये खरेदी दिसून आल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कायम असल्याचे चित्र होते. ग्रासिम इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी आली. तसेच अपोलो, इंटरग्लोब एव्हिएशन, बजाज ऑटो आणि एचडीएफसी लाइफयांच्या शेअर्समध्येही चांगली वाढ झाली.
मिडकॅप विभागात मिडकप व्हिजीट हनीवेल ऑटोमेशन इंडिया केनेस टेक्नॉलॉजी आणि टाटा कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्येही मजबूत तेजी पाहायला मिळाली. दरम्यान, विदेशी चलन बाजारात भारतीय रुपयालाही काहीसा दिलासा मिळाला. कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये नरमाई आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये बाजाराबाबत सकारात्मक वातावरण कायम असल्याचे चित्र दिसून आले.