पुणे काँग्रेसमध्ये नवे शहराध्यक्ष म्हणून प्रशांत जगताप यांची नियुक्ती

    दिनांक :21-May-2026
Total Views |
पुणे
Prashant Jagtap पुणे काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय निर्णय घेत शहराध्यक्षपदी प्रशांत जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या जगताप यांच्यावर थेट शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने पक्षांतर्गत राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
 

Prashant Jagtap 
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्याच्या प्रयत्नात असून त्याचाच भाग म्हणून पुणे शहराध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यात आला आहे. पक्ष नेतृत्वाने पुणे शहराची विभागणी करत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांसाठी वेगवेगळे शहराध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात प्रशांत जगताप यांना पूर्व पुण्याची धुरा देण्यात आली असून पश्चिम पुण्याची जबाबदारी माजी आमदार दीप्ती चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
 
 
जगताप यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नगरसेवक, महापौर आणि शहराध्यक्ष अशा विविध पदांपर्यंत राहिला आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर इतक्या लवकर त्यांच्यावर मोठी संघटनात्मक जबाबदारी येणे हे अनेकांसाठी आश्चर्यकारक मानले जात आहे. पक्षाच्या निर्णयामागे त्यांच्या आक्रमक राजकीय शैलीचा आणि संघटनात्मक अनुभवाचा विचार झाल्याचे मानले जाते.
 
 
मात्र या नियुक्तीमुळे Prashant Jagtap काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले काही जुन्या नेत्यांचे नाव मागे पडल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेषतः जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्याने पक्षात आलेल्या नेत्याला थेट महत्त्वाची जबाबदारी दिल्याने गटबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर एकजूट राखणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे काँग्रेसला कितपत बळ मिळते, आणि अंतर्गत मतभेद कसे हाताळले जातात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.