यवतमाळ,
Raju Padgilwar जिल्हा कौशल विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळच्या जिल्हास्तरीय रोजगार व उद्योजक मेळावे समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून राजू पडगिलवार यांची नियुक्ती करण्यात आली. ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री म्हणून कार्यरत आहेत.
Raju Padgilwar या समितीत नगर परिषद मुख्याधिकारी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, सहायक कामगार आयुक्त, जिल्हा कामगार कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी, यांच्या मार्गदर्शनात ही समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी राजू पडगिलवार यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीसाठी त्यांनी या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य समन्वयक माजी मंत्री डॉ. रणजित पाटील, माजी मंत्री मदन येरावार, जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चौहान, नितीन भुतडा यांचे आभार मानले. यावेळी प्रभारी उपायुक्त कौशल विकास व रोजगार उद्योजकता विभागाचे परेश जाधव आणि जिल्हा कौशल व रोजगार विकास अधिकारी सीमा खिरोडकर यांनी राजू पडगिलवार यांचे स्वागत केले.