प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे यांनी स्वीकारला पदभार

    दिनांक :21-May-2026
Total Views |
नागपूर, 
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. अखिलेश वसंतराव पेशवे यांनी गुरुवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला. कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी नवनियुक्त प्र-कुलगुरूंचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
 

Akhelesh 
विद्यापीठाचे १४ वे प्र-कुलगुरू म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. पेशवे यांनी आपल्या कार्यालयात कामकाजाला सुरुवात केली. यावेळी विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मंगला हिरवाडे तसेच ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. विजय खंडाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्र-कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विविध शिक्षक संघटना, विभागीय संघटना आणि कर्मचारी संघटनांच्या वतीने डॉ. पेशवे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. विद्यापीठ परिसरात यावेळी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University  डॉ. पेशवे यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.