50 लाखांच्या थकबाकीप्रकरणी 27 जणांचे मीटर काढले

    दिनांक :21-May-2026
Total Views |
पांढरपेशीही रडारवर

यवतमाळ, 
Regarding Electricity Bill Arrears थकीत वीजबिल आणि वीज चोरीविरोधात महावितरणने सलग तिसèया दिवशीही धडक कारवाई सुरू ठेवली आहे. विशेष मोहिमेअंतर्गत तब्बल 50 लाख रुपयांची थकबाकी असलेल्या 27 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली असून संबंधितांचे वीज मीटर काढून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.
 
 
vij
 
Regarding Electricity Bill Arrears  विशेष म्हणजे, या कारवाईत काही पांढरपेशी आणि प्रतिष्ठित व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. वारंवार नोटीस देऊनही थकबाकी न भरल्याने अखेर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दरम्यान, यापूर्वीही महावितरणने शहरातील आलिशान बंगल्यांवर धाडसत्र राबवत वीज चोरी करणाèयांवर जवळपास एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. वाढती थकबाकी आणि वीज चोरीमुळे विभागाचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने पुढील काळातही अशी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे अधिकाèयांनी स्पष्ट केले. या कारवाईमुळे वीज चोरी करणारे आणि वीज बिल न भरणाèयांचे धाबे दणाणले आहेत. आतापर्यंत महावितरण केवळ गरीबांवरच कारवाई करते, अशी भावना नागरिकांमध्ये होती. मात्र आता प्रतिष्ठित आणि धनदांडग्यांवरही कारवाई होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत केले जात आहे.