रितेश देशमुखसमोर पापाराझींनी मागितली माफी

    दिनांक :21-May-2026
Total Views |
मुंबई
salman khan दिग्दर्शक व अभिनेता रितेश देशमुख यांच्या बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या यशसोहळ्यात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि पापाराझी यांच्यातील एक भावनिक आणि चर्चेचा विषय ठरलेला प्रसंग पाहायला मिळाला. या सोहळ्यात सलमान खानने उपस्थित छायाचित्रकारांकडून झालेल्या गैरसमजाबद्दलची माफी स्वीकारत वातावरण हलके केले
 

ritesh deshmukh, salman khan, paparazzi apology, 
काही दिवसांपूर्वी सलमान खान यांच्यासंदर्भात झालेल्या एका घटनेनंतर पापाराझी वर्तुळात निर्माण झालेला तणाव या कार्यक्रमात दूर झाला. ‘राजा शिवाजी’च्या यशाच्या सेलिब्रेशनदरम्यान पापाराझींनी सलमान खान यांच्यासमोर दिलगिरी व्यक्त केली. त्यावर सलमान खान यांनी सौम्य प्रतिक्रिया देत “सॉरी भाई, सॉरी” असे म्हणत परिस्थिती निवळवली आणि सर्वांना आश्चर्यचकित करत वातावरण मैत्रीपूर्ण केले.या प्रसंगी उपस्थित असलेल्या रितेश देशमुख यांच्या समोर हा संपूर्ण प्रसंग घडला. कार्यक्रमात चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा होत असतानाच घडलेल्या या घटनेमुळे काही काळ सर्वांचे लक्ष त्या दिशेने वळले. मात्र सलमान खान यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे कार्यक्रमातील तणाव कमी होऊन पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक salman khan  पार्श्वभूमीवर आधारित भव्य चित्रपट असून, रितेश देशमुख यांनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांचा सहभाग असून, चित्रपटाने प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिसवरही दमदार कामगिरी केली आहे.दरम्यान, यशसोहळ्यातील हा सलमान खान आणि पापाराझी यांच्यातील संवाद सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून, चाहत्यांमध्येही याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.