- नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर देवपायली परिसरातील घटना
गोंदिया,
ST Bus Accident अनियंत्रित झालेल्या एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी २१ मे रोजी नागपूर - रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर देवपायली गावशिवारात दुपार २.३० वाजताच्या सुमारास घडली. शंकर चव्हाण (५०), राहुल मेंढे (३०) व रामेश्वर मडावी (४५) तिघेही रा. पुराडा, ता. देवरी अशी जखमींची नावे आहे.
ST Bus Accident मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार तिघेही दुचाकी एमएच ३५ एई ३०३२ ने देवरीकडून कोहमाराकडे राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना देवपायली गावशिवारात देवरीवरून साकोलीच्या दिशेने जात असलेल्या एसटी बस क्रमांक एमएच १४ एमएच ५२४६ च्या चालकाचे स्टेअरींगवरून नियंत्रण सुटल्याने भरधाव बसची दुचाकीला मागून धडक बसली. ज्यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. यावेळी गावकर्यांनी घटनास्थळावर धाव घेत १०८ रुग्णवाहिकेने तिघांनाही सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात भर्ती केले व घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व घटनेची नोंद केली आहे.