मुंबई
Suniel Shetty देशभरात वाढत्या इंधनदरांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असताना अभिनेता सुनील शेट्टी यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका विनोदी पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींसोबतच अनेक भागांत इंधनटंचाईची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सुनील शेट्टी यांनी त्यांच्या आगामी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील एक मजेशीर दृश्य शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोमवारी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचे टायटल साँग प्रदर्शित झाल्यानंतर सुनील शेट्टी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ते आणि अभिनेता अक्षय कुमार घोड्यावर स्वार होताना दिसत आहेत. चित्रपटातील या दृश्याला त्यांनी सध्याच्या इंधनदरवाढीशी जोडत विनोदी शैलीत कॅप्शन दिले आहे.
“पेट्रोल का सीन टाईट है… म्हणून घोडेस्वारी करत आहोत… एका Suniel Shetty जबरदस्त प्रवासाची सुरुवात 26 जून 2026 पासून,” असे कॅप्शन सुनील शेट्टी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी इंधनदरवाढीवर विनोदी कमेंट्स करत पोस्टला पसंती दर्शवली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.