चंद्रपूर पोहचले 46.8 वर
चंद्रपूर,
temperature in Brahmapuri मागील आठवडा भरापासून जिल्ह्याच्या तापमानाचा पारा सतत वाढत असताना 21 मे हा यावर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला असून, विदर्भात ब्रम्हपुरीचे तापमान सर्वाधिक 47.1 अंश सेल्सिअस, तर चंद्रपूरच्या तापमानाची 46.8 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.
temperature in Brahmapuri चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी अत्यंत मोठा इशारा दिला आहे. जिल्ह्यात शुक्रवार ते रविवार म्हणजेच 22 ते 24 मे या कालावधीत तीव्र उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ वर्तविण्यात आला आहे. वाढत्या तापमानाच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाने तत्काळ मार्गदर्शक सूचना जारी करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी ब्रम्हपुरी व चंद्रपूरच्या पाठोपाठ गडचिरोली 46.4, वर्धा 46.4, नागपूर 46.0, अमरावती 45.8, गोंदिया 45.2, यवतमाळ 45.0, भंडारा 45.0, अकोला 44.9, वाशिम 42.6, बुलढाणा जिल्ह्यात 41.0 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद घेण्यात आली आहे.