आगीशी खेळू नका!

बळी आणि नमाजावरून बंगालमध्ये तणाव

    दिनांक :21-May-2026
Total Views |
कोलकाता,
Tension in Bengal over Eid पश्चिम बंगालमध्ये बकरीदपूर्वी धार्मिक प्रथा, नमाज आणि प्राण्यांच्या बळीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हुमायून कबीर यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्यावर जोरदार टीका करत मुस्लिम समाजाच्या धार्मिक प्रथांमध्ये हस्तक्षेप न करण्याचा इशारा दिला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना हुमायून कबीर यांनी म्हटले की, कायद्याच्या चौकटीत राहून धार्मिक परंपरा पाळल्या जातील आणि त्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधत धार्मिक मुद्द्यांवरून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. तसेच, सरकारने ईदच्या नमाजासाठी पुरेशी मैदाने उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा लोकांना रस्त्यावर नमाज अदा करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
humayun and dharmadhikari
दुसरीकडे भाजप नेत्यांनी रस्त्यांवरील नमाजाला विरोध करत हा मुद्दा कोणत्याही धर्माविरोधात नसून सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. काही भाजप नेत्यांनी संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया आणि इराणसारख्या देशांमध्येही सार्वजनिक रस्त्यांवरील नमाजावर निर्बंध असल्याचा उल्लेख केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने बकरीदपूर्वी जनावरांच्या कत्तलीसंदर्भातील नियमांची पुन्हा आठवण करून देणारी सूचना जारी केली आहे. सरकारच्या आदेशानुसार, फिटनेस प्रमाणपत्राशिवाय गाय, म्हैस, बैल किंवा वासराची कत्तल करण्यास बंदी राहणार आहे. संबंधित जनावरांच्या तपासणीनंतर अधिकृत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पश्चिम बंगालमध्ये धार्मिक आणि राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, बकरीदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष सतर्कता वाढवली आहे.