कारंजा लाड,
two wheeler accident नागपूर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेलूबाजार रस्त्यावरील मांडवा फाट्यावर बुधवारी २० मे रोजी सायंकाळी दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात साहिल जितेंद्र उपाध्ये (वय २०) रा. वनोजा, ता. मंगरुळनाथ आणि सागर अरविंद सोनुने (वय २२) रा. किन्हीराजा, ता. मालेगाव यांचा मृत्यू झाला. तर सतीश पंजाबराव ठाकरे (वय ३५, ) रा. वाई, ता. कारंजा हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साहिल उपाध्ये आणि सतीश ठाकरे हे दुचाकीने शेलूबाजार येथून वाईकडे जात होते. त्याचवेळी सागर सोनुने हा विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येत असताना दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोघांच्याही डोयाला गंभीर दुखापत होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला.two wheeler accident घटनेची माहिती मिळताच गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख आणि आई एकविरा रुग्णवाहिकेचे विनोद खोंड यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव खडसे यांनी साहिल उपाध्ये व सागर सोनुने यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी सतीश ठाकरे यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बाहेरगावी हलविण्यात आले.