*जलसाठा निम्म्याहूनही घसरले
*लहान ११ प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर
वर्धा,
Water Storage Projects Run Dry जिल्ह्यातील ११ मोठ्या व मध्यम जलाशयांत सध्या २३७.३७ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे जलाशयांतील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन तसेच भू-गर्भातील पाणी पातळी खाली जात आहे. त्यातच लहान प्रकल्पांपैकी ११ प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात मोठे व मध्यम ११ जलाशय आहेत. या जलाशयातूनच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्या जाते. सोबतच शेती सिंचन आणि औद्योगिक वापरासाठीही पाणी सोडले जाते. गतवर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिला. नंतर दमदार पाऊस कोसळल्याने जिल्ह्यातील जलाशय ओव्हर फ्लो झाले होते.
जलाशयांतील पाणी पिण्यासह सिंचन व औद्योगिक वापरासाठी वेळोवेळी सोडण्यात आल्याने जलाशयांतील पाणी पातळी खालावली. सोबतच उन्हाळ्यात भू-गर्भातील पाणी पातळीही झपाट्याने खालावत गेली. मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानाने उच्चांक गाठल्याने झपाट्याने पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागले आहे. गत उन्हाळ्याच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील ११ मोठ्या व मध्यम जलाशयांत बर्यापैकी पाणी साठा उपलब्ध आहे. मात्र, मान्सून वेळीच न धडकल्यास जिल्ह्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शयताही वर्तविली जात आहे.
Water Storage Projects Run Dry जिल्ह्यात मोठे व मध्यम असे ११ तसेच लहान २१ प्रकल्प आहे. वाढत्या तापमानामुळे लहान प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यातील ११ प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. लहान प्रकल्पांमध्ये सध्या केवळ २६ टके जलसाठा शिल्लक आहे. कवाडी प्रकल्पात १८.२७ टके, सावंगीत १३.२१ टके, लहादेवीत १२.९३ टके, पारगोठाणमध्ये १८.४२ टके, अंबाझरी ९.४५ टके, पांजरा बोथलीत २४.२७, उमरी २३.९२, टेंभरीत ३५.३५, आंजी बोरखेडी ४५.१३, दहेगाव गोंडी ४५.४० टके, कुर्हा २५.४२ टके, रोठा-१ १८.४३, रोठा-२ मध्ये २९.९०, आष्टी ५३.८२, पिलापूर २३.६३, कन्नमवारग्राम २७.५९ टके, परसोडी ३४.४७, हराशी १३.२४, मलकापूर ३१.८४, टाकळी बोरखेडी १७.६६ टके आणि शिरूड प्रकल्पात २३.४६ टके पाणीसाठा उपलब्ध आहे.
धाममध्ये ४२ टकेच पाणी
महाकाळी येथील धाम प्रकल्प शहरासह १४ गावे व धाम नदी काठावरील सुमारे ६ गावांच्या तहान भागवते. सध्या दोन दिवसांआड नळांद्वारे पाणी पुरवठा होत आहे. धाम प्रकल्पात आता केवळ ४२ टके पाणी शिल्लक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पाणी पुरवठ्यात कपात होण्याची शयता व्यत केली जात आहे.
मोठ्या, मध्यम प्रकल्पांची स्थिती
जलाशय : जलसाठा
बोर प्रकल्प : ५१.७६ टक्के
निम्न वर्धा : ४८.७५ टक्के
धाम प्रकल्प : ४२.७४ टक्के
पोथरा प्रकल्प : १६.६१ टक्के
पंचधारा प्रकल्प : २९.८३ टक्के
डोंगरगाव प्रकल्प : ३६.४० टक्के
मदन प्रकल्प : ३८.०७ टक्के
मदन उन्नई धरण : ००.०० टक्के
लाल नाला : ४६.१७ टक्के
वर्धा कार नदी : ३०.२९ टक्के
सुकळी लघु प्रकल्प : १४.७० टक्के