मुंबई
who’s your gynac season 2, हलक्याफुलक्या विनोदाची शैली, सहजपणे जोडता येणाऱ्या व्यक्तिरेखा आणि आधुनिक स्त्रीजीवनाकडे संवेदनशील दृष्टीकोनातून पाहणाऱ्या कथानकामुळे प्रेक्षकांची पसंती मिळवलेली लोकप्रिय कॉमेडी-ड्रामा मालिका ‘हू’ज युवर गायनॅक’ आता दुसऱ्या सीझनसह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज या बहुप्रतीक्षित नव्या सीझनचा ट्रेलर सादर करण्यात आला.
भारतातील आघाडीची मोफत, प्रीमियम आणि जाहिरात-आधारित व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा Amazon MX Player ने हा ट्रेलर प्रदर्शित केला असून, नव्या सीझनमध्ये पुन्हा एकदा डॉ. विदुषी कोठारीची कथा पुढे सरकताना दिसणार आहे. पहिल्या सीझननंतर तिच्या आयुष्यात आलेल्या बदलांपासून सुरू झालेला हा प्रवास आता एका नव्या टप्प्यावर पोहोचतो आहे, जिथे तिची स्वप्ने आणि वास्तव यांचा संघर्ष अधिक ठळकपणे उलगडताना दिसणार आहे.
Saba Azad ही मुख्य भूमिकेत असलेली ही मालिका The Viral Fever (TVF) आणि गर्लियापा यांच्या निर्मितीतून साकारली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी Himali Shah यांनी सांभाळली आहे. या सीझनमध्ये करिश्मा सिंह, आरॉन अर्जुन कौल, कुणाल ठाकूर, विभा छिब्बर आणि श्रुती सेठ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, पहिल्या सीझनमधील घटनांनंतर तीन महिन्यांनी डॉ. विदुषी कोठारीने स्वतःचे क्लिनिक सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. मात्र स्वतंत्रपणे क्लिनिक चालवणे, आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळणे आणि वैयक्तिक असुरक्षिततेशी सामना करणे या सगळ्या आव्हानांमध्ये तिची दमछाक होताना दिसते. अशा परिस्थितीत तिचे मित्र आणि सहकारी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याचेही ट्रेलरमध्ये अधोरेखित होते.