शेतकर्‍याचा उष्माघाताने मृत्यू

    दिनांक :22-May-2026
Total Views |
सुरळी शेतशिवारातील घटना
 
वरूड, 
तालुक्यातील सुरळी येथील ५५ वर्षीय शेतकरी Prahlad Brahmane प्रल्हाद तुळशीराम ब्राह्मणे यांचा शेतामध्ये काम करतेवेळी उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेमुळे सुरळी गावात शोककळा पसरली. प्रल्हाद ब्राह्मणे हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी आपल्या शेतात गेले. दुपारी १२ वाजताच्या सुमारास घरच्यां लोकांनी त्यांना फोन केला. परंतु, तीन वाजेपर्यंत त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कुटुंबीयांनी अखेर शेतात धाव घेतली.
 

Prahlad Brahmane 
 
तेव्हा Prahlad Brahmane  प्रल्हाद ब्राह्मणे यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात आढळून आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. मृतदेह वरूड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.परीक्षित रामपुरे यांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले तसेच एक मुलगी असा परिवार आहे.