अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले परिवहन कर्मचारी

    दिनांक :22-May-2026
Total Views |
आरटीओ कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे कौतुक

यवतमाळ, 
Accident on Yavatmal Bypass यवतमाळ बायपासवर गुरुवारी रात्री घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री 8.50 वाजताच्या दरम्यान हुंडई शोरूमजवळ भरधाव वेगातील एका कारचा गंभीर अपघात होऊन वाहन पलटी झाले. अपघाताचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. मात्र कारमधील प्रवाशांची अवस्था पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. अपघातग्रस्त कारमध्ये दोन जण गंभीररीत्या अडकले होते. रक्तबंबाळ अवस्थेत ते मदतीसाठी आर्त हाक देत होते. उपस्थित नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिकेला संपर्क साधला, मात्र बराच वेळ उलटूनही अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचू शकली नाही. प्रत्येक क्षण महत्त्वाचा ठरत जखमींचा जीव धोक्यात आला होता.
 
 
acci
 
याचवेळी तिथून जात असलेले परिवहन विभागाचे सहायक मोटर वाहन निरीक्षक बिभीषण जाधव, शासकीय वाहन चालक आकाश भोकरे यांनी घटनास्थळी गर्दी पाहून गाडी थांबवली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी पुढाकार घेतला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी कारमध्ये अडकलेल्या दोन्ही जखमींना अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढले. आधी जीव वाचवणे महत्त्वाचे, हा विचार मनात ठेवून त्यांनी कोणतीही औपचारिकता न पाहता जखमींना थेट शासकीय वाहनातून जिल्हा रुग्णालयात हलवले.
 
 
 
Accident on Yavatmal Bypass  आरटीओ कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळू शकले. एवढ्यावरच न थांबता संबंधित कर्मचाऱ्यांनी जखमींच्या कुटुंबियांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली व त्यांना धीर दिला. या घटनेमुळे परिवहन विभागाच्या कर्मचाèयांनी दाखवलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. काही वेळा शासकीय कर्तव्यापेक्षा माणुसकीचे कर्तव्य मोठे असते. आम्ही फक्त आमचे कर्तव्य पार पाडले, अशी भावना यावेळी बिभीषण जाधव आणि त्यांच्या सहकाèयांनी व्यक्त केली.