मुंबई
AI video Narendra Modi कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी नाफिज आलम याच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित व्यक्तीने 19 मे रोजी इंस्टाग्रामवर एक AI-निर्मित व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह आणि अपशब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप असून, त्यातून पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हा प्रकार भारतीय जनता युवा मोर्चाच्या वसंत स्मृती कार्यालयातील पदाधिकारी दीपकसिंग आजादसिंग यांच्या निदर्शनास आला. सोशल मीडियावर सुरू असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवण्याच्या कामादरम्यान त्यांनी हा व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित इंस्टाग्राम प्रोफाइलची तपासणी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अकाउंटवरून सातत्याने राजकीय स्वरूपाचे, विशेषतः भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्याविरोधातील पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रोफाइलला सुमारे 9,500 फॉलोअर्स असल्याचेही समोर आले आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची AI video Narendra Modi गंभीर दखल घेत AI व्हिडिओ तयार करण्याची पद्धत, त्यामागील उद्देश आणि सोशल मीडिया अकाउंटची सखोल चौकशी सुरू केली आहे. संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींबाबत चुकीची किंवा दिशाभूल करणारी सामग्री प्रसारित करणे गंभीर गुन्हा मानला जात असून, त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, या प्रकरणामुळे AI तंत्रज्ञानाच्या गैरवापराबाबत आणि सोशल मीडियावरील जबाबदारीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.