wardha printing on cloth पर्यावरण संवर्धन ही केवळ घोषणांपुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीतून कशी जपावी, याचा आदर्श राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत शिक्षा वर्गातून पाहायला मिळत आहे. संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून वर्धेत आयोजित करण्यात आलेल्या शिक्षा वर्गासाठी लावण्यात आलेले दिशादर्शन फलक पर्यावरणपूरक आहेत.
सध्या लहान मोठ्या कार्यक्रमं, वाढदिवस, स्वागत समारंभात सर्वत्र प्लास्टिक फ्लेस दिसुन येतात. ते पर्यावरणाला हानी पोहोचवणारे आहे, हे स्पष्ट असतानाही फ्लेसचा वापर मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. मात्र, रा. स्व. संघ विदर्भ प्रांत शिक्षा वर्षानिमित्त लावण्यात आलेल्या दिशादर्शक कापडावर आकर्षक प्रिंटिंग करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचविणार्या प्लास्टिकचा वापर टाळत एक सकारात्मक आणि अनुकरणीय संदेश समाजासमोर ठेवण्यात आला आहे. फ्लेस मशीनवर संगणकावर करण्यात आलेला जॉबवर्क लावण्यात आले. ते जॉबवर्कच्या आकारात फ्लेसवर कापड लावून त्यावर प्रिंटींग करण्यात आले. फ्लेसप्रमाणेच आकर्षक असे ते प्रिंटींग दिसते आहे. नागपूर यवतमाळ मार्गावर असलेल्या नागठाणा परिसरात हे दिशादर्शक लागले असुन लक्ष वेधून घेत आहे. कापडी फलकांमुळे परिसरालाही एक साधेपणासह पारंपरिक आणि संस्कारमय स्वरूप प्राप्त झाले आहे.
विशेष म्हणजे, शिबिरामध्ये चहा, पाणी किंवा अन्य कोणत्याही वापरासाठी प्लास्टिकचे कप, पेले अथवा साहित्य वापरण्यात आलेले नाही. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, हा संदेश स्वयंसेवकांच्या कृतीतून स्पष्टपणे दिसून येत आहे.wardha printing on cloth आजच्या काळात मोठ्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर होत असताना, वधेर्र्तील या उपक्रमाने वेगळी दिशा दाखवली आहे. पर्यावरण रक्षणासाठी केवळ भाषणे नव्हे तर कृती आवश्यक आहे, हे या शिबिरातून अधोरेखित झाले आहे.