ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्ड शिबिर

    दिनांक :22-May-2026
Total Views |
नागपूर,
Card camp आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जिल्हा प्रमुख राकेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून पायोनियर सोसायटी व अग्ने लेआउट, श्री हनुमान मंदिर परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्ड नोंदणी व वितरण शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिरात एकूण २१९ ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७० वर्षांवरील १२८ ज्येष्ठ नागरिकांना वय वंदन कार्ड देण्यात आले, तर ७० वर्षांखालील पात्र नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आले.
 
Card camp
 
शिबिरादरम्यान कु. कांचन बारस्कर आणि कु. लीना फोफळे यांनी कार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. शिबिर यशस्वी होण्यासाठी पांडुरंग फिस्के, अशोक दगडे, जयंत दलाल, दिनकर सुपले, ओंकार श्रीखंडे, चंद्रकांत बावणे, Card camp कृष्णराव भार्गव, जगदीश नेरलवार आदी ज्येष्ठ नागरिकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संपर्क प्रमुख म्हणून ओंकार श्रीखंडे यांनी जबाबदारी सांभाळली.
सौजन्य: ओंकार श्रीखंडे, संपर्क मित्र