देवभूमीत रस्त्यावर नमाज नाही!

मुख्यमंत्री धामी यांचा स्पष्ट इशारा

    दिनांक :22-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Chief Minister Dhami's Stern Warning उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात सार्वजनिक रस्त्यांवर नमाज पठण करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत त्यांनी रस्ते अडवून धार्मिक कार्यक्रम करण्यावर कठोर भूमिका घेतली.मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले की, सध्या राज्यात चारधाम यात्रा सुरू असून मोठ्या संख्येने भाविक उत्तराखंडमध्ये येत आहेत. अशा परिस्थितीत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि शांततापूर्ण वातावरण कायम राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
 
Chief Minister Dhami
ते म्हणाले की, प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर केला जातो, मात्र सार्वजनिक रस्ते अडवून नागरिकांना त्रास देणे मान्य केले जाणार नाही. नमाज पठण मशिदी, ईदगाह किंवा प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणीच व्हावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी काँग्रेसवर तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. काही राजकीय पक्ष मतांच्या राजकारणासाठी रस्त्यांवरील नमाजाला समर्थन देत असल्याचा दावा करत उत्तराखंड सरकारचे धोरण पूर्णपणे स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते अडवून वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. देवभूमीची शांतता, संस्कृती आणि शिस्त कोणालाही बिघडवू दिली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.