मुंबई
Cockroach Janata Party गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी हे नाव प्रचंड चर्चेत आहे. सुरुवातीला अनेकांनी हा एखादा विनोदी मीम ट्रेंड किंवा फक्त मनोरंजनासाठी तयार करण्यात आलेले पेज असल्याचे मानले . मात्र, अल्पावधीतच या पेजने सोशल मीडियावर अशी लोकप्रियता मिळवली की, लाखो नव्हे तर कोट्यवधी नेटिझन्स त्याच्याशी जोडले गेले. विशेष म्हणजे, या व्यंग्यात्मक मोहिमेने सामान्य तरुणांसोबतच बॉलिवूड कलाकार, दिग्दर्शक, कॉमेडियन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनाही आकर्षित केले आहे.
या ट्रेंडला मनोरंजन क्षेत्रातूनही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री दिया मिर्झा, गायक विशाल ददलानी, अभिनेत्री फातिमा सना शेख, कोंकणा सेन शर्मा, ईशा गुप्ता तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद, कॉमेडियन कुणाल कामरा Cockroach Janata Party आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी या पेजला फॉलो केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ट्रेंडची चर्चा आणखी वाढली असून तरुणांमध्ये तो विशेष लोकप्रिय ठरत आहे.