ढब्यावरील वेटरच निघाला राजकुमारचा मारेकरी

स्थानिक गुन्हे शाखेकडून खुनाच्या गुन्ह्याचा पर्दाफाश आरोपी अटकेत

    दिनांक :22-May-2026
Total Views |
गोंदिया
Crime Gondia  तालुक्यातील रावणवाडी येथील महाजन ढाब्याचे मालक राजकुमार हरिणखेडे यांच्या खून प्रकरणाचा अखेर स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने शुक्रवारी 22 मे रोजी उलगडा केला असून, ढाब्यावर काम करणार्‍या वेटरनेच दारूसाठी पैसे दिले नाही व शिवीगाळ करून मारहाण केल्याचा राग मनात ठेऊन राजकुमार यांचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. महेश प्रकाश नेवारे (22) रा. मुरपार, ता. जि. गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.
 
crime gondiya
 
Crime Gondia मृत राजकुमार हरिणखेडे यांचा 19 मे रोजी रात्री दहा ते अकराच्या सुमारास खून झाला. 20 मे रोजी ही घटना उघडकीस येताच पत्नी दुर्गा हरिणखेडे यांनी रावणवाडी पोलिसात तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाला गती दिली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक या गुन्ह्याचा तपास करीत असताना महाजन ढाब्यावर काम करणारा कामगार महेश नेवारे याच्या हालचाली संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. यावर पथकाने मुरपार येथे जाऊन महेश नेवारे याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता,
 
Crime Gondia  सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणार्‍या महेशने ढाबा मालक राजकुमार हरिणखेडे यांचा खून केल्याचे कबूल केले. यावेळी त्याने सांगितले की, नेहमीप्रमाणे घटनेच्या दिवशी रात्री महेशने ढाबा मालक राजकुमार हरिणखेडे यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी महेश व त्यांच्यात भांडण झाले. त्यामुळे त्यांनी महेशला शिवीगाळ करीत मारहाण केली. हाच राग मनात धरून महेशने रात्री दहा ते अकराच्या सुमारास झोपेत असलेल्या राजकुमारच्या डोक्यावर दगड आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक करून पुढील तपासासाठी रावणवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.