25 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज
बाभुळगाव,
Fire at fodder warehouse तालुक्यातील सरूळ सिद्धेश्वर शिवमंदिरातील गोरक्षणाच्या चारा डेपोला गुरुवारी दुपारी अचानकपणे आग लागली. या आगीत 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ही आग अचानकपणे लागली. या गोदामात हरभèयाचे कुटार, तुरीचे कुटार, कडबा, गव्हाचा गावंडा भरून होता. पाहतापाहता आगीने रौद्ररूप धारण केले. मंदिर विश्वस्तांनी पोलिस, महसूल व अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.
Fire at fodder warehouse धामणगाव रेल्वे व यवतमाळ येथील अग्निशमन दलाच्या गाड्या गोरक्षणात पोहोचल्या. सोबतच तहसीलदार मीरा पागोरे, पोलिस उपनिरीक्षक दीपक आसकर आपल्या ताफ्यासह तसेच तलाठी अविनाश सरडे, पोलिस पाटील रसिका मेश्राम व सिद्धेश्वर शिवमंदिर विश्वस्त गोरक्षण परिसरात पोहोचले. दोन्ही अग्निशामक दलाच्या गाड्यांनी आग विझवली. मात्र तोपर्यंत 25 लाख रुपयांचा मुक्या जनावरांचा चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आता 300 जनावरांच्या वैरणीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.