दहावीत शासकीय निवासी शाळांचा 100 टक्के निकाल

    दिनांक :22-May-2026
Total Views |
विद्यार्थिनींचे घवघवीत यश
मोहिनी पाईकराव अमरावती विभागात प्रथम

यवतमाळ, 
Government Residential Schools Result: 100% सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत अनुसूचित जाती मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळांनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील सातही निवासी शाळांचा निकाल जवळपास 100 टक्के लागला असून शाळांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली.
 

R e 
 (संग्रहित छायाचित्र)
 
अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, महागाव येथील तब्बल 11 विद्यार्थिनींनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे. त्यामध्ये आरुषी अनिल जाधव व उपेक्षा गौतम खंदारे यांनी प्रत्येकी 93.40 टक्के गुण मिळविले. तन्वी देवेंद्र भगत 92.40 टक्के, दर्शना दिलीप नरवाडे 91.40 टक्के, कांचन रामचंद्र वानखेडे 91.40, संजीवनी गजानन वानखेडे 91.20, अप्राजिता माधव सोंगाडे 91, शुतिका विनोद इंगोले, प्राजली गजानन जाधव व समता दलित कांबळे यांनी प्रत्येकी 90.60 तर नियती चिंतामण खोकले हिने 90 टक्के गुण मिळविले.
 
 
Government Residential Schools Result: 100% अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, मरसुळ ता. उमरखेड येथील कु. मोहिनी अनिल पाईकराव हिने 93.60 टक्के गुण मिळवून समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळांमधून अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यशस्वी विद्यार्थिनी, मार्गदर्शन करणाèया मुख्याध्यापक मंगला बालाजी भोयर व सुनंदा श्रीराम बोरीकर, शिक्षक आणि पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सहायक आयुक्त, मंगला मून यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. पालकांनी आपल्या पाल्यांना समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यांनी केले.