अस्मिता ठाकरे व मेघा यंगड यांचे बारावी परीक्षेत सुयश

    दिनांक :22-May-2026
Total Views |
कळंब :
Indira Junior College इंदिरा कनिष्ठ महाविद्यालय कला शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. अस्मिता शंकर ठाकरे हिने महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला. तर मेघा सुदाम यंगड हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कला शाखेतून मुलींनीच बाजी मारली असून त्यांनी महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.
 
 
y22May-Indira
 
Indira Junior College  प्राचार्य डॉ. पवन मांडवकर, उपाध्यक्ष डॉ. वीरा मांडवकर, उपप्राचार्य प्रा. सरोज लखदिवे, पर्यवेक्षक प्रा. राम भुरके व वर्गशिक्षक प्रा. कविता बोरकर यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. आर्थिक कमकुवत गटातील आणि विपरीत परिस्थितीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात म्हणून कुठलेेही शुल्क न आकारता शिक्षण देत यशप्राप्ती करून देणारे हे इंदिरा महाविद्यालय आहे, अशी माहिती उपाध्यक्ष डॉ. वीरा मांडवकर यांनी दिली.