यवतमाळ :
Job Fair Cancelled जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांच्या वतीने दि. 26 मे रोजी बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा तथा प्लेसमेंट ड्राईव्ह रद्द करण्यात आला आहे.
Job Fair Cancelled महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 16 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक 2026 ची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, यवतमाळ यांच्या 18 मे च्या पत्रान्वये जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती देण्यात आली. या रोजगार मेळाव्यात सहभागी होणारे उद्योजक, उमेदवार तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांनी कळविले आहे.