मंगळसूत्र आणि हिरव्या बांगड्या... कंगना पुन्हा चर्चेत

गुपचूप लग्न केल्याच्या चर्चांना उधाण

    दिनांक :22-May-2026
Total Views |
मुंबई
Kangana Ranaut बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत ही नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि वेगळ्या शैलीमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. कंगनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये ती गळ्यात मंगळसूत्र आणि हातात हिरव्या बांगड्या घालून दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, कंगनाने गुपचूप लग्न केल्याची चर्चा रंगू लागली आहे.
 

Kangana Ranaut marriage rumors, 
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कंगना तिच्या घराबाहेर पडताना दिसते. तिच्यासोबत सुरक्षा रक्षकांचा ताफाही होता. यावेळी तिने फिकट गुलाबी रंगाचा पारंपरिक सूट परिधान केला होता. कपाळावर टिकली, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात हिरव्या बांगड्या असा तिचा पूर्णपणे विवाहित महिलेसारखा लूक पाहायला मिळाला. पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडिओ टिपण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणाशीही संवाद न साधता ती शांतपणे गाडीत बसून निघून गेली.
 
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी विविध अंदाज बांधण्यास सुरुवात केली. “कंगनाने लग्न केले का?”, “तिने गुपचूप विवाह उरकला आहे का?” अशा प्रश्नांनी कमेंट्स सेक्शन भरून गेला. काही चाहत्यांनी तिच्या या लूकमागे एखाद्या चित्रपटाचे शूटिंग असू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर काहींनी हा लूक तिच्या आगामी चित्रपटासाठी असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, कंगना रणौत Kangana Ranaut  किंवा तिच्या टीमकडून या व्हायरल व्हिडिओबाबत अथवा लग्नाच्या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे. काही वृत्तांनुसार, कंगनाने नुकतेच तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून, तिचा हा लूक त्या चित्रपटाचाच भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कंगनाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. त्यामुळे तिचा हा नवीन लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, ती खरंच विवाहबंधनात अडकली आहे की हा फक्त चित्रपटातील पात्राचा भाग आहे, याबाबतचे रहस्य अद्याप कायम आहे.