रोबोटिक बुवॉय ठरला 'देवदूत' तरुणीचा जीव वाचला

    दिनांक :22-May-2026
Total Views |
अलिबाग /पुणे
Kashid beach rescue रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील २० वर्षीय तरुणीचा समुद्रात बुडण्याच्या घटनेंत अखेर पोलिस आणि अत्याधुनिक ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’च्या मदतीने जीव वाचवण्यात यश आले. सुट्टीच्या आनंदात समुद्रात उतरलेल्या या तरुणीवर अचानक आलेल्या लाटांमुळे संकट ओढवले, मात्र वेळेत करण्यात आलेल्या संयुक्त बचावकारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
 

Kashid beach rescue, Alibaug drowning incident, 
प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील ही तरुणी कुटुंबासोबत काशीद समुद्रकिनारी फिरण्यासाठी आली होती. दुपारच्या सुमारास ती पाण्यात उतरली असताना अचानक खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ती गटांगळ्या खाऊ लागली आणि मदतीसाठी आरडाओरड करू लागली. किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या पर्यटकांनी आणि स्थानिकांनी ही बाब तातडीने जीवरक्षक व पोलिसांच्या निदर्शनास Kashid beach rescue  आणून दिली.घटनेची माहिती मिळताच काशीद किनाऱ्यावर तैनात असलेले जीवरक्षक आणि पोलिस कर्मचारी तत्काळ समुद्रात उतरले. त्याचवेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तैनात केलेल्या आधुनिक ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ला कार्यान्वित करण्यात आले. काही क्षणांतच हे उपकरण बुडणाऱ्या तरुणीपर्यंत पोहोचले आणि तिला सुरक्षितरीत्या किनाऱ्यावर आणण्यात आले. त्यामुळे अत्यंत नाजूक परिस्थितीतून तिचा जीव वाचवणे शक्य झाले.बचाव झाल्यानंतर तिला तातडीने प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर उपस्थित पर्यटकांनी जीवरक्षक, पोलिस आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झालेल्या जलद बचावकार्याचे कौतुक केले.
 
 
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील काशीद, नागाव आणि हरिहरेश्वर या समुद्रकिनाऱ्यांवर अलीकडेच अशा प्रकारच्या ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ची तैनाती करण्यात आली आहे. समुद्रातील बुडण्याच्या घटनांमध्ये तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरत असून, यापूर्वीही अशा उपकरणांच्या मदतीने काही पर्यटकांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.या घटनेमुळे पुन्हा एकदा समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षिततेचा मुद्दा अधोरेखित झाला असून, प्रशासनाकडून पर्यटकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.