समुद्रपूर,
Kini Kharda: Gas Leakage तालुयातील किणी खर्डा येथे गॅस लिकेजमुळे लागलेल्या आगीत आनंदा हिवरकर यांचे घर जळून खाक झाले. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे, धान्य, रोख तसेच इतर मौल्यवान वस्तू जळून अंदाजे पावणेदाने लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज २२ रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, घरामध्ये गॅस गळती झाल्यानंतर अचानक आग भडकली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आग वाढत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गावकर्यांनी पाणी व इतर साधनांच्या साहाय्याने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
Kini Kharda: Gas Leakage घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार राहुल मानकर, ज्योती राऊत, आशिष वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे आग इतर घरांपर्यंत पसरली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत हिवरकर कुटुं बाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून प्रशासनाकडून नुकसानग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.