डॉक्टर होण्याचे स्वप्न डोळ्यासमोरच विरले 'किडनी निकामी'

    दिनांक :22-May-2026
Total Views |
लातूर,
Vishwajit Telange लातूर येथील एका गुणवंत विद्यार्थ्याच्या आयुष्याभोवती निर्माण झालेल्या गंभीर घडामोडींमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीट (NEET) परीक्षेची सलग तीन वर्षे तयारी करणाऱ्या विश्वजित तेलंगे या विद्यार्थ्याला गंभीर आरोग्य संकटाला सामोरे जावे लागले असून, त्याचबरोबर पेपरफुटीच्या आरोपांमुळे त्याचे शैक्षणिक भवितव्य अधिकच अंधारात गेल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
 

Vishwajit Telange  
विश्वजितने डॉक्टर होण्यासाठी दिवस-रात्र कठोर अभ्यास केला. तो दररोज आठ ते दहा तास अभ्यास करत असल्याचे कुटुंबीय सांगतात. तथापि, दीर्घकाळ चाललेल्या मानसिक आणि शारीरिक ताणामुळे त्याच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला आणि त्याला दोन्ही किडनी Vishwajit Telange  निकामी झाल्याचे सांगितले जाते. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर कुटुंबीयांनी उपचार सुरू केले असून, त्याच्या आजीने किडनी दान केल्याने त्याला नवजीवन मिळाले आहे. दीर्घ उपचारांनंतर तो नुकताच घरी परतला आहे.दरम्यान, या संपूर्ण काळात त्याच्या शैक्षणिक प्रवासातही अडथळे निर्माण झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. विश्वजितने आजारपणाशी झुंज देत सलग तीन वेळा नीट परीक्षा दिली. मात्र, प्रत्येक वेळी पेपरफुटीच्या बातम्या समोर आल्याने त्याच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आणि नैराश्याचे वातावरण निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
 
 
“आम्ही प्रामाणिकपणे Vishwajit Telange  अभ्यास करतो, शरीर आणि मन पणाला लावतो, पण काही जण पैसे देऊन गैरमार्गाने यश मिळवतात,” अशी खंत विश्वजित आणि त्याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी मांडली आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांची हालचाल वाढल्याचेही समोर आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) कडून या प्रकरणाशी संबंधित तपास सुरू असल्याची माहिती असून, लातूर परिसरातील काही संशयित कुटुंबांची चौकशी करण्यात आल्याचे कळते. विशेष म्हणजे, विश्वजितच्या घराशेजारी राहणाऱ्या कुटुंबाचीही चौकशी झाल्याने या प्रकरणाचे धागेदोरे अधिक खोलवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.