शिवसेनेकडून दर्यापुरकरांना उमेदवारी द्या

    दिनांक :22-May-2026
Total Views |
नगरसेवकांची उपमुख्यमंत्री शिंदे यांना मागणी
 
कारंजा (घा.), 
Legislative Council Election वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या तीन मतदार संघातील विधान परिषदेच्या रित जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी कारंजा येथील नितीन दर्यापूरकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात यावी या मागणीचे निवेदन येथील नगरसेवकांनी शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून देण्यात आले.
 
 
shinde
 
Legislative Council Election  वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये भाजपचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले असल्यामुळे विधान परिषदेची उमेदवारी शिवसेनेला देण्यात यावी. त्यामुळे विदर्भातील संघटनात्मक वाढीसाठी सुद्धा पोषक वातावरण तयार होईल, असे निवेदनात नमुद केले आहे. यावेळी ना. संजय राठोड, आर्वी विधानसभा प्रमुख किरण पांडव, नितीन दर्यापूरकर, नगरपंचायत उपाध्यक्ष भागवान बुवाडे, नगरसेवक संजय मस्के, राजेंद्र लाडके, विशाल इंगळे, गजानन भिलकर, प्रवीण ढबाले उपस्थित होते.