रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

    दिनांक :22-May-2026
Total Views |
*विरुर रेल्वे स्थानकाजवळील घटना

राजुरा, 
Leopard killed in train collision.बल्हारशाह-काजीपेठ या अप लाईनच्या रेल्वे मार्गावरील विरुर रेल्वे स्थानकादरम्यान सिंधी नाला पुलानजीक शुक्रवार, 22 मे रोजी पहाटेच्या सुमारास रेल्वे गाडीच्या धडकेत अंदाजे 5 वर्षीय मादी बिबट्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती रेल्वे कर्मचार्‍यांनी सकाळी विरुर वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना दिली. माहिती कळताच उपविभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश दिघे, राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे, क्षेत्र सहायक राकेश गुरनुले, सहायक आयुक्त पशुसंवर्धनचे डॉ. एस. पी. तेलंग, पशुधन विकास अधिकारी भाग्यश्री बेलसरे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केले.
 

vitya 
 
Leopard killed in train collision. तपासणीदरम्यान रेल्वेच्या धडकेतच बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. बिबट्याचे सर्व अवयव शाबूत होते. त्यानंतर मृत बिबट्याला सुमठाना रोपवाटिकेत आणून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सर्व डाक्टर, वनाधिकारी यांच्या समक्ष दहन करण्यात आले. यावेळी यावेळी वनाधिकार्‍यांसह क्षेत्र सहायक, तसेच वनरक्षक नरेश लाडसे, रवी वैद्य, आर. ए. मून तसेच वनमजूर उपस्थित होते. बल्हारशाह काजीपेठ हा दक्षिण मध्यरेल्वे मार्ग राजुरा, विरुर या घनदाट वनक्षेत्रातून जात या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाघ, बिबट, अस्वल आदी वन्यप्राणी मोठ्या संख्येत आहे. परंतु, या वन्यप्राणीना वनक्षेत्रात भ्रमण करताना या रेल्वे ट्रकवरून जावे लागत आहे. परिणामी रेल्वेचा अंदाज येत नसल्याने रेल्वेची धडक बसून, या वन्यप्राण्यांचा नाहक जीव जात आहे. मागील तीन चार वर्षात सुमारे दहाच्यावर वाघ, बिबट, अस्वल, रोही, चितळ अशा वन्यप्राण्यांचा बळी गेला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या मार्गात अंडर पासिंग, पूल, संरक्षण जाळी लावण्यात यावी, अशी मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने सातत्याने करण्यात आली आहे.