शेतकऱ्यांसाठी अरुणावती प्रकल्पातील राखीव पाणी सोडा : आ. राजू तोडसाम

    दिनांक :22-May-2026
Total Views |
आर्णी, 
MLA Raju Todsam अरुणावती प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणाèया आर्णी व घाटंजी तालुक्यातील गावांना प्रकल्पाचे पाणी मिळावे म्हणून आमदार राजू तोडसाम यांनी गुरुवार, 21 मे रोजी जिल्हाधिकाèयांकडे पत्राद्वारे मागणी केली. सध्या उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. रोज 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील नदी, नाले, पाणवठे, विहिरी, बोअरवेल, हातपंप आटले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली आहेत.
 

Raju ne 
 
MLA Raju Todsam  ऊस, फळबाग, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता आहे. परंतु कुठलीही पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतातील तसेच जंगलातील पाणवठेे आटल्याने गुरेढोरे तसेच जंगली जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे अरुणावती प्रकल्पातील राखीव पाणीसाठा शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण लोकांना तसेच पाळीव व जंगली प्राण्यांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करावा, अशी मागणी आ. राजू तोडसाम यांनी जिल्हाधिकाèयांकडे केली आहे. त्यामुळे परिसरातील जनतेचा पाणी प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल.