चेहरा रक्तबंबाळ...! कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मॉडेलवर हल्ला: VIDEO

    दिनांक :22-May-2026
Total Views |
कान्स,
cannes-film-festival : जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यान एका मॉडेलवर झालेल्या मारहाणीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. रेड कार्पेट इव्हेंटदरम्यान ही धक्कादायक घटना घडली असून, फेस्टिव्हलच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
 
CANS
 
 
वृत्तानुसार, 'मिस व्हेनेझुएला २०२५' अँड्रिया डेल कार्यक्रमस्थळी उपस्थित असताना अचानक काही व्यक्तींनी तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
 
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
 


सौजन्य:सोशल मीडिया
 
 
या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आयोजकांकडून अद्याप अधिकृत निवेदन आलेले नाही.