नागपूर,
Belatarodi Police बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सहकार्याने तत्पर व धाडसी कारवाई करत एका महिलेचा जीव वाचवून संभाव्य हत्या टाळली. गोटाळपांजरी परिसरात नाईट पेट्रोलिंगदरम्यान आरोपीच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली की त्यांचा मुलगा पत्नीवर चाकूने हल्ला करत आहे.
माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नारायण घोडके व अंमलदार रितेश गोतमारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घरात प्रवेश केला. तेव्हा आरोपी ऋषिकेश वानखडे हा त्याच्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करत असल्याचे आढळले. Belatarodi Police पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आरोपीला ताब्यात घेतले आणि जखमी महिलेस एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने महिलेचा जीव वाचला असून तिची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र