रेल्वेतील ३० हजार पदे सरेंडर करण्याच्या निषेधार्थ आंदोलन

    दिनांक :22-May-2026
Total Views |
विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक कार्यालयासमोर निषेध सभा

नागपूर, 
Railway Post Surrender Agitation रेल्वेतील ३० हजार पदे सरेंडर करण्याच्या निषेधार्थ भारतीय रेल्वे मजदूर संघाच्या वतीने मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक कार्यालयासमोर निषेध सभा घेत आंदोलन करण्यात आले. आंदोलनात रेल्वे कर्मचारी संघाशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस सागर सिंग तोमर, उपाध्यक्ष हबीब खान, सदस्य सूरज चौधरी, नागपूर विभागाचे उपाध्यक्ष विवेक चाटे आदींची उपस्थिती होती.
 
rail-mazhdoor-sangh
 
Railway Post Surrender Agitation  भारतीय मजदूर संघ (बीएमएस)व भारतीय रेल्वे मजदूर संघाच्या आवाहनावरून नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयाच्या आवारात सभा घेण्यात आली. या सभेनंतर संघटनेच्या प्रतिनिधींनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना एक निवेदन सादर केले. रेल्वे कर्मचार्‍यांनी काळ्या पट्ट्या बांधून आंदोलनात सहभाग नोंदविला. एमआरकेएसचे महासचिव सागर सिंग तोमर यांनी रेल्वे प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले की, जर रेल्वे बोर्डाने कर्मचारी आणि संबंधित रेल्वेविरुद्धचा तुघलक हुकूमनामा मागे घेतला नाही, तर एमआरकेएस आंदोलन सुरू करेल आणि संघर्ष सुरूच ठेवणार आहे. रेल्वेला आवश्यक असून रेल्वेतील मनुष्यबळ कपातीविरोधात रेल्वे कर्मचार्‍यांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.