कार्यकर्ता विकास वर्गातील स्वयंसेवकांचे पथसंचलन

    दिनांक :22-May-2026
Total Views |
-दोन्ही पथसंचलने महाल चौकात येणार एकत्र
 
नागपूर, 
Rss pathsanchalan कार्यकर्ता विकास वर्गात आलेल्या देशभरातील स्वयंसेवकांची 2 पथसंचलने शनिवारी सायंकाळी निघणार असून महाल चौकात ते एकत्रित होणार आहेत. रा.स्व. संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय सामान्य रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात सुरू आहे. यावर्षी या वर्गात, संघ रचनेच्या सर्व प्रदेश व प्रांतांमधील विविध भाषा बोलणारे, 21 ते 40 वयोगटातील 880 स्वयंसेवक प्रशिक्षण घेत आहेत. पहाटे 4 वाजेपासून ते रात्री 10.30 वाजेपर्यंत शाखा तंत्र व संघटनेसाठी योग्य शिक्षणासोबतच देशाची वर्तमान माहिती दिली जाते. समाजजागरण व परिवर्तनासंबंधी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. भारतीयत्व दर्शवणारे कार्यक्रम सादर केले जातात.
 

rss 
 (संग्रहित छायाचित्र)
 
 
Rss pathsanchalan या वर्गात सरसंघचालक, सरकार्यवाह आदींसह अ. भा. अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळते. संवाद होतो. याच अंतर्गत उद्या शनिवारी 23 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता या स्वयंसेवकांची दोन पथसंचलने निघणार आहेत. पहिले पथसंचलन रेशीमबागेतील द्वार क्रमांक दोनमधून (सी.पी. अँड बेरार) निघेल. लोकांची शाळा, अशोक चौक, उजवीकडे थेट छत्रपती शिवाजी महाराज चौक, उजवीकडे महाल चौकात पोहोचेल. दुसरे पथसंचलन द्वार क्रमांक पाचमधून निघून गजानन चौक, डावीकडे जुनी शुक्रवारीतून थेट झेंडा चौक, डावीकडे थेट कल्याणेश्वर मंदिरासमोरून महाल चौकात पोहोचेल. दोन्ही पथसंचलने सायंकाळी 6.55 वाजता महाल चौकात एकत्र येतील. मातृसेवा संघ, सी.पी. अँड बेरार कॉलेज मार्गाने रेशीमबागेत पोहोचतील. महाल चौकात रा.स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, वर्गाचे सर्वाधिकारी सरदार महेंद्रसिंग मग्गो, वर्गाचे पालक अधिकारी सहसरकार्यवाह अतुल लिमये या पथसंचलनाचे अवलोकन करतील.