संजय खाडे यांच्या वाढदिवशी विविध सामाजिक उपक्रम

    दिनांक :22-May-2026
Total Views |
वणी, 
Sanjay Khade शेतकरी व कामगार नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, 23 मे रोजी वणी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर, वृद्धाश्रमात साहित्य वाटप, रुग्णांना फळवाटप तसेच कार्यालयाचे उदघाटन अशा विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जाणार आहे.
 
 
sanjay
 
सकाळी 10.30 वाजता शेतकरी मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश देत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अपघात, शस्त्रक्रिया तसेच विविध आजारांमुळे रक्ताची सतत गरज भासत असल्याने समाजहिताच्या भावनेतून हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले. दुपारच्या सत्रात वणी येथील वृद्धाश्रमात उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, याचवेळी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटपही करण्यात येणार आहे.
 
 
Sanjay Khade  दरम्यान, संध्याकाळी 6 वाजता डीएसके कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स या व्यावसायिक कार्यालयाचे उदघाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके राहणार आहेत. संजय खाडे यांचे चिरंजीव धनंजय खाडे या कार्यालयाचे संचालक आहेत. विकासाभिमुख उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्व कार्यक्रमांसाठी संजय खाडे फाऊंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था तसेच संजय खाडे मित्रपरिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत.