पुणे,
School starting June 15 राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात येत्या १५ जूनपासून होणार असून माध्यमिक शाळांचे अधिकृत शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी करून सर्व मान्यताप्राप्त शाळांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, शाळांचे पहिले सत्र १५ जूनपासून सुरू होऊन ३१ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर दिवाळी सणानिमित्त विद्यार्थ्यांना २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान सुट्टी देण्यात येणार आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर दुसरे सत्र पुन्हा सुरू होईल. दुसरे सत्र १ मे २०२७ पर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, उन्हाळी सुट्टी ३ मे २०२७ ते १४ जून २०२७ या कालावधीत असेल. नवीन शैक्षणिक वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून शाळा पुन्हा गजबजण्याची तयारी सुरू झाली आहे.