एमडी विक्रेत्या दाम्पत्यास ठोकल्या बेड्या

    दिनांक :22-May-2026
Total Views |
वर्धा, 
Selling MD Drug Arrested मेफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची विक्री करणारा सराईत गुन्हेगार व त्याच्या पत्नीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने माहितीच्या आधारे २१ रोजी मॉडेल हायस्कूल जवळ अशोकनगर तारफैल येथील रहीम शेख याच्या घरी छापा टाकला.
 
 
md
 
Selling MD Drug Arrested  तेथे शेख रहीम शेख रशीद (४२) व त्याची पत्नी शहाणा जाफीर शेख (३६) हे एम.डी.ची विक्री करताना आढळून आले. विचारपूस केली असता त्यांना एम.डी.चा पुरवठा वसीम अहमद खान पठाण याने केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ४.५० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले. शिवाय तिन्ही आरोपींविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाही पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, सागर भोसले, अक्षय राऊत, अभिषेक नाईक, निलीमा उमक यांनी केली.